वसई विरारमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य; कचरा वर्गीकरणावर पालिकेचे दुर्लक्ष

वसई विरारमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य; कचरा वर्गीकरणावर पालिकेचे दुर्लक्ष

वसई ः वसई विरार शहर महापालिकेने जरी "सुंदर शहर, वसई शहर' असा नारा दिला असला तरी मात्र ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे. पालिकेकडून कचरा वर्गीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी होत नसल्याने दिसून येत आहे. वर्गीकरण करणे तर लांबची गोष्ट मात्र शहरात टाकरण्यात येणारा कचरा देखील पालिकेकडून वेळच्या वेळी उचला जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

वसईमधील माणिकपूर, बाभोळा, सातिवली, वालीव, नवजीवन, नालासोपारा गाव, संतोषभुवन, धानीव बाग, पेल्हार, वसई फाटा यासह आजूबाजूच्या परिसरात कचरा भिरकावला जात आहे. फेरीवाले देखील कचरा कुठेही टाकून निघून जात असल्याचे चित्र दिसते. हातगाडीवरून कचरा नेवून तो रस्त्याच्या मोकळ्या ठिकाणी टाकला जातो. विक्री न झालेल्या नाशिवंत भाज्या, फळे, प्लास्टिक आदींचा समावेश आहे. यामुळे दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे परंतु महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीच कठोर पावले उचलली नाहीत.जनावरांचा वावर देखील कचऱ्याजवळ असतो. कागदापासून ते अगदी घरातील राडारोडा, शिळे अन्न, प्लॅस्टिक, फर्निचर, जुने साहित्य देखील रस्त्याच्या बाजूला टाकले जात आहे. 

वसई पूर्वेला कचराभूमी आहे. याठिकाणचा कचरा कमी व्हावा म्हणून नागरिकांनी वर्गीकरण करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे परंतु कचरा जैसे थे या परिस्थितीत पडलेला असतो. हा कचरा उचलण्याची तसदी अनेकदा घेतली जात नाही. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यास पालिका असमर्थ ठरत आहे. हा कचरा नाले, गटारात जातो व पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात पावसाळ्यात देखील पाण्याचा निचरा होत नाही. शून्य कचरा मोहीम, खतनिर्मिती, मालमत्ता करात सूट आदी योजना जरी महापालिकेने आणल्या असल्या तरी अस्वच्छतेचे साम्राज्य कमी झाल्याचे दिसत नाही. पर्यायाने प्रदूषण, घाण दुर्गंधी आदींचा सामना नागरी, औद्योगिक वसाहतींना करावा लागत आहे. 

सर्व प्रभागात कचरा वेळेवर उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या प्रभागातील परिसरात स्वच्छता नसेल त्याची पाहणी संबंधित विभागाला देऊन , परिसर नीटनेटका ठेवण्यात येईल. नागरिकांनी देखील कचराकुंडीत वर्गीकरण करूनच कचरा टाकावा. रस्त्यावर कचरा भिरकावू नये. 
- गंगाथरन डी.,
आयुक्त , वसई विरार शहर महापालिका. 

The uncleanliness in Vasai Virar Municipal negligence on waste sorting

------------------------------------------------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com