घाटकोपरमध्ये बनावट तेलाचा साठा जप्त, FADचा तेलाच्या दुकानावर छापा

भाग्यश्री भुवड
Friday, 27 November 2020

घाटकोपर येथील तेलाच्या दुकानावर छापा घातला. या छाप्यामध्ये 1418,6 किलोचे 1 लाख 82 हजार 969 रुपये किंमतीचे सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले.

मुंबई: दुय्यम दर्जाच्या तेलाची साठवणूक, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर आणि ब्रँडेड तेलाचे लेबल पत्र्याच्या डब्यांवर लावण्यात येत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने 25 नोव्हेंबरला घाटकोपर येथील तेलाच्या दुकानावर छापा घातला. या छाप्यामध्ये 1418,6 किलोचे 1 लाख 82 हजार 969 रुपये किंमतीचे सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले.

बनावट तेलाचा साठा घाटकोपर येथील दुकानात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएने छापा टाकत बनावट तेलाचा दोन लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला. तसेच या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

एलबीएस रोड, घाटकोपर पश्चिम, गावदेवी रोड, मौलाना चाळ, अंबिका आईल डेपो या ठिकाणी बनावट तेलाचा साठा असल्याची माहिती एफडीएला मिळाली. एफडीएच्या युनिट नंबर 8 ने दुकानावर छापा टाकत बनावट तेलाचा साठा जप्त केला असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. कोकोनंट आईल, वनस्पती तेल, असा एकूण 1,418.6 किलोचा 1 लाख 82 हजार 969 रुपयांचा साठा जप्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

अधिक वाचा-  STच्या स्मार्ट कार्ड योजनेला चार महिन्याची मुदतवाढ, परिवहन मंत्र्यांची घोषणा

अंबिका ऑईल डेपोमध्ये घातलेल्या छाप्यामध्ये सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले. यामध्ये माली ब्रँडचे 88.4 किलोग्रॅम वजनाचे 20 हजार 627 किंमतीचे नारळ तेल, सरगम ब्रँडचे 343.4 किलोचे 46 हजार 130 वजनाचे शेंगतेल, बन्सीवाला ब्रँडचे 208.4 किलोचे 27 हजार 994 किंमतीचे राईचे तेल, लायन ब्रँडचे वनस्पती डालडा 778.4 किलोचे 46 हजार 130 किमतीचे उत्पादन तसेच सुट्ट्या स्वरुपातील तेलही जप्त करण्यात आले. जप्त केलेला माल 1418.6 किलो असून, त्याचे बाजार मूल्य 1 लाख 82 हजार 969 रुपये इतके आहे.

अधिक वाचा-  कोरोनाची लस आल्यावर नागरिकांना देण्याचा प्राधान्यक्रम कसा राहील ? स्वतः राजेश टोपे यांनी दिली माहिती

नुकत्याच झालेल्या दिवाळीदरम्यान एफडीएने राज्यभरात केलेल्या कारवाईमध्ये 48 लाख 44 हजार 532 रुपये किमतीचे खाद्यतेल, तूप, वनस्पती जप्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर येथील ऑईल डेपोवर केलेली कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fake oil stocks seized in Ghatkopar FDA raids oil shops


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake oil stocks seized in Ghatkopar FDA raids oil shops