
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात एका न्यायबंदीने रागाच्या भरात एका पोलीस हवालदाराला ठोश्या बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या न्यायबंदीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एका गुन्ह्यातील सुनावणीच्या कामासाठी पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते. सुनावणीच्या वेळीही या न्यायबंदीने न्यायालयात न्यायदंडाधिकारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता, असे खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. सुरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा (वय 29) असे न्यायबंदीचे नाव आहे.