Chhota Rajan Extortion Case | छोटा राजनला CBI विशेष न्यायालयाचा दणका; दोन वर्षाचा तुरुंगवास

तुषार सोनवणे
Monday, 4 January 2021

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय( CBI )च्या विशेष न्यायालयाने खंडणीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय( CBI )च्या विशेष न्यायालयाने खंडणीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे. खरं तर ही पाच वर्षापूर्वीची घटना आहे. वर्षाभरापूर्वीच हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते.सीबीआने राजनच्या विरुद्ध अनेक पुरावे गोळा केले होते. छोटा राजनसह अन्य तीन जणांनाही याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. सर्वांना 2-2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सीबीआयच्या चौकशीनंतर अशी माहिती समोर आली की, पनवेल स्थित बिल्डर नंदूच्या कार्यालयात राजन याने आपले गुंड पाठवले. यासंबधी सीसीटीव्ही चित्रफित न्यायालयात दाखवण्यात आली. यासोबतच एक ऑडिओ क्लिप देखील न्यायालयासमोर ठेवण्यात आली. त्यातही राजन संबधित बिल्डरला धमकवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी ठक्कर याला अद्याप ताब्यात घेण्यास यंत्रणांना य़श आलेले नाही. तो अनेक दिवसांपासून फरार आहे.

मोठी बातमी : एक दिवस आधीच वर्षा राऊत ED कार्यालयात चौकशीसाठी हजर

यापूर्वी देखील राजन याला ऑगस्ट 2019 साली मोक्का न्यायालयाने बीआर शेट्टी गोळीबार प्रकरणाी दोषी करार देऊन 8 वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. शेट्टी पेशाने व्यवसाईक होते राजन गँगने 2012 साली त्यांची हत्या केली होती.

 

----------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: underworld don chhota rajan sentenced to two years in extortion case