esakal | मोठी बातमी : एक दिवस आधीच वर्षा राऊत ED कार्यालयात चौकशीसाठी हजर
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : एक दिवस आधीच वर्षा राऊत ED कार्यालयात चौकशीसाठी हजर

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यात.

मोठी बातमी : एक दिवस आधीच वर्षा राऊत ED कार्यालयात चौकशीसाठी हजर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यात. वर्षा राऊत यांना मागील वेळी समन्स आल्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली होती. यानंतर वर्षा राऊत यांनी ED चौकशीसाठी हजर राहण्यास काही दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यानंतर आज वर्षा राऊत ED  कार्यालयात हजर झाल्यात. 

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ED  ने नोटीस बजावत २९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर वर्षा राऊत यांच्याकडून अतिरिक्त वेळ मागून घेण्यात आला होता. खरंतर वर्षा राऊत यांच्याकडून पाच जानेवारी पर्यंतचा वेळ मागून घेण्यात आलेला. दरम्यान आज एक दिवस आधीच वर्षा राऊत या ED कार्यालयात हजर झाल्यात. 

हेही वाचा - मलेरियाचे अचूक निदान शक्य, कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल ठरणार वरदान

काय आहे प्रकरण : 

PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला प्रकरण हे EOW करत होती, नंतर हे प्रकरण ED कडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आलं. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं समजलं. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. हे पैसे का घेतले गेले याची माहिती ED ला हवी आहे. राज्यसभेच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केल्याचीही माहिती आहे. या 55 लाखांच्या माहितीसाठी ED ने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. 

दरम्यान, आता वर्षा राऊत चौकशीनंतर याबाबत काही बोलतात का किंवा संजय राऊत यावर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

Varsha raut wife of sanjaty raut present in front of ED one day before the deadline