esakal | बेरोजगारीनं त्रस्त तरुणाचा मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न!
sakal

बोलून बातमी शोधा

mantralay

बेरोजगारीनं त्रस्त तरुणाचा मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : बेरोजगारीनं त्रस्त झालेल्या एका तरुणानं मंत्रालयाच्या परिसरात मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. या तरुणावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Unemployed youth attempts suicide near Mantralaya Mumbai aau85)

हेही वाचा: सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळाले स्थायी कमिशन

ओमप्रकाश जंगम असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा रायगडच्या महाड येथील रावढळचा रहिवाशी आहे. त्याचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारा जंगम मागील अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. काम मिळत नसल्यामुळे त्याला नैराश्य आलं होतं. या नैराश्यातूनच त्यानं मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मंत्रालय परिसरात साफसफाईचं काम करत असताना सोबत फिनाईलची बाटली आणली होती.

हेही वाचा: Mumbai Blast : यासिन भटकळसह दोघांवर आरोप निश्चिती

कामधंदा काम न मिळाल्यानं नैराश्यातून त्यानं नागरिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी फिनाइलची बाटलीतील फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये काही फिनाईल त्याच्या शरिरात गेल्यानं त्याला तातडीनं जे. जे. रुग्णालयात हालवण्यात आलं. सध्या त्यायवर इथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

loading image