esakal | Mumbai Blast : यासिन भटकळसह दोघांवर आरोप निश्चिती
sakal

बोलून बातमी शोधा

yasin bhatkal

Mumbai Blast : यासिन भटकळसह दोघांवर आरोप निश्चिती

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी यासिन भटकळसह दोघांवर आज विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी झालेल्या या बॉम्बस्फोटामुळं मुंबई हादरली होती. आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. (Mumbai Blast Charges against Yasin Bhatkal confirmed aau85)

हेही वाचा: राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक असलेल्या भटकळसह एजाज सईद शेखवर आरोप निश्चित करण्यात आले. मोक्का, युएपीए (अतिरेकी कारवाया) यांसह हत्या, कटकारस्थान, हत्यारे कायदा इ. नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहेत, मात्र आरोपींनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. हैदराबाद बॉम्बस्फोट खटल्यात (सन 2013) त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: गणपती उत्सवासाठी कोकणात 2,200 एसटी बस सोडणार

मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट खटल्यासाठी तेथील न्यायालयात हजर करा अशी मागणी आरोपींनी केली होती. मात्र, फाशी सुनावल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हजर करण्यासाठी न्यायालयाने नकार दिला. भटकळला अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. मात्र, आरोप निश्चित करण्याबाबत त्याने नकार दिला होता. यामुळे खटल्याला विलंब होत असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाने खडसावल्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोप निश्चित करायला भटकळने सहमती दिली.

हेही वाचा: "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही"

सन २०११ मध्ये मुंबईमध्ये झवेरी बाजार, ओपेरा हाऊस आणि दादर कबूतर खान्याजवळ तीन बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये २७ निष्पाप नागरिक आणि १२७ जण गंभीर जखमी झाले होते. भटकळने भायखळ्यातील एका भाड्याच्या खोलीत राहून बॉम्ब तयार केले आणि त्यानंतर ते पेरले होते.

loading image