Dr. B.R. Ambedkar Statue
esakal
मुंबई : महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा (Dr. B.R. Ambedkar Statue) युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट म्हणून दिला होता. संविधान दिनानिमित्त पॅरिसमधील युनेस्को (UNESCO) मुख्यालयाच्या प्रांगणात काल (ता. २६) या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जागतिक पातळीवरील या मानाच्या क्षणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अभिमान व्यक्त करत युनेस्कोच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.