Travels Journey : अनफिट खासगी ट्रॅव्हल्सचा रत्नागीरी ते मुंबई प्रवास

समृद्धी महामार्गावर १ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यु झाल्यानंतरही परिवहन विभागाला जाग आली नाही.
Private Travel
Private Travelsakal

मुंबई - समृद्धी महामार्गावर १ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यु झाल्यानंतरही परिवहन विभागाला जाग आली नाही. मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर आझाद मैदानात आंदोलनासाठी आलेल्या ६० महिला कर्मचाऱ्यांना मुंबईत आणणारी एमएच४३ बिपी८४८५ क्रमांकाची खासगी बस चक्क अनफिट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

परिवहन विभागातील नोंदीवरून माहिती उघड झाली असून, त्याहूनही धक्कादायक म्हणजे परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाच्या काही अंतरावरच बांधकाम भवन रस्त्यांवर या बसचे पार्किंग करूनही परिवहन विभागाचे दुर्लक्ष आहे.

सकाळ ने यापुर्वीच राज्याच्या रस्त्यांवर अनफिट वाहनांमधून सर्रास प्रवासी वाहतुक केली जात असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. मात्र, त्यानंतरही परिवहन विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून आला नाही.

मात्र, अधिवेशनाच्या निमीत्ताने या अनफिट बसचा मुंबई - गोवा महामार्गावरून रत्नागिरी ते मुंबई झालेला धक्कायादायक प्रवास परिवहन विभागाच्या कारभाराचा बुरुखा फाडतांना दिसते. बसच्या प्रवासादरम्यान विविध परिवहन कार्यालयाचे चेकपोस्ट पार करून अनफिट बस मुंबईत पोहचली कशी यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आझाद मैदानात आंदोलकांची सध्या धुम आहे. त्यासाठी राज्यभरातून अन्यायग्रस्त कर्मचारी, नागरिक, संघंटना मुंबईत पोहचल्या आहे. मात्र, ज्या वाहनांमधून ते मुंबईत दाखल होतात. अशा वाहनांची साधी तपासणी, चौकशी सुद्धा मुंबईच्या प्रवेशद्वारावर केली जात नाही. परिणामी अशा वाहनांचा महामार्गांवर अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

अनफिट बसवर ७ चलान

या बसवर २०२१ पासून आतापर्यंत वाहतुक नियमांच्या पायमल्लीचे तब्बल ७ चलान प्रलंबित आहे. तर बोरीवली उपप्रादेशिक कार्यालयाने या बसला ब्लाॅक केले आहे. त्यानंतरही बस रस्त्यावर प्रवासी वाहतुक करत आहे. यामध्ये २० आॅगष्ट २०२० डेप्युटी आरटीओ रत्नागीरी, ६ फेब्रुवारी २०२१ मध्ये पेन आरटीओ, ८ मार्च २०२१ रोजी डेप्युटी आरटीओ रत्नागीरी, १२ जुलै २०२१ मुंबई पश्चिम आरटीओ, २० मे २०२२ रोजी मुंबई पश्चिम आरटीओ, २१ एप्रिल २०२२ डेप्युटी आरटीओ बोरीवली, २१ जुन २०२३ डेप्युटी आरटीओ बोरीवली

३१ आॅक्टोंबर रोजी बसचे फिटणेस संपले

५ नोव्हेंबर रोजी नोंदणी झालेल्या बसचे फिटनेस ३१ आॅक्टोंबर २०२१ रोजी संपले आहे. तर वाहन कर सुद्धा ३० जुन २०२३ रोजी संपले असून, डेप्युटी आरटीओ बोरीवलीने या बसला ब्लाॅक केल्याचाही उल्लेख परिवहन विभागाच्या अधिकृत यंत्रणेतून दिसते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com