esakal | मुंबईत लसींचा तुटवडा; दिवसभरात केवळ ३ हजार जणांचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

मुंबईत लसींचा तुटवडा; दिवसभरात केवळ ३ हजार जणांचे लसीकरण

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मुंबईने लसीकरण मोहिमेत अग्रस्थानी आहे, पण सध्या लसींच्या तुटवड्याचा फटका लसीकरण कार्यक्रमाला बसला असून सोमवारच्या दिवसात केवळ 3 हजार 211 जणांचेच लसीकरण झाले. राज्य सरकारच्या एकाही केंद्रांवर आज लसीकरण झाले नाही. (Unfortunately Only 3 Thousand Mumbaikars got Vaccinated on Monday due to Shortage)

हेही वाचा: म्हणून मोदी लॉकडाउन टाळतायत, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा

मुंबई पालिकेच्या 50 लसीकरण केंद्रांवर आज केवळ 5 सेशन्स झाली. त्यात 2 हजार 400 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. तर 73 खासगी लसीकरण केंद्रांमध्ये आज केवळ 2 सेशन्स झाली. त्यात 811 लाभार्थींचे लसीकरण झाले. असे एकूण 141 लसीकरण केंद्रांवर मिळून 7 सेशन्समध्ये केवळ 3 हजार 211 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. मुंबईत आतापर्यंत एकूण 24 लाख 59 हजार 883 लाभार्थींचे लसीकरण झाले आहे. त्यात कोव्हीशिल्ड चे 22 लाख 97 हजार 741 तर कोव्हॅक्सीनचे 1 लाख 62 हजार 142 डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा: राजीव गांधी रुग्णालयात अवघ्या १८ जणांचे लसीकरण !

मुंबईत 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू

मुंबई पालिकेच्या नायर, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) करोना केंद्र, कूपर, सेव्हन हिल्स आणि राजावाडी या पाच केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात आले. नोंदणी करून टाईम स्लॉट दिल्यानंतर हे लसीकरण करण्यात येणार आहे.

loading image
go to top