esakal | राजीव गांधी रुग्णालयात अवघ्या १८ जणांचे लसीकरण !
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Gandhi Hospital

राजीव गांधी रुग्णालयात अवघ्या १८ जणांचे लसीकरण !

sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

येरवडा : शहरात कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा असताना राजीव गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कामगार दिनाला १८ ते ४४ वयोगटातील अवघ्या अठराजणांनी लस घेतली. रविवारी १८६ जणांनी तर सोमवारी ३५० जणांनी लस घेतली. गेल्या तीन दिवसात ५५४जणांनी लस घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी लोकरे यांनी दिली.

शहरात कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. पहिल्या दिवसी महाराष्ट्र दिनाला राजीव गांधी रुग्णालयात अवघ्या १८ तर कमला नेहरू मध्ये २८ जणांनी लस घेतली. रविवारी राजीव गांधी रुग्णालयात १८६ तर कमल नेहरू मध्ये २४० जणांनी लस घेतली. सोमवारी मात्र दोन्ही ठिकाणी लसीकरण सुरळीतपणे सुरू होते. राजीव गांधी रुग्णालयात सोमवार दुपारी तीन वाजेपर्यंत ३३०जणांनी लस घेतल्याची माहिती डॉ. लोकरे यांनी दिली.

लसीकरणासाठी युवकांचा उत्साह

राजीव गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी युवकांचा उत्साह दिसून आला. सकाळी नऊ पासूनच युवक रांगेत उभे हाेते.थोडाफार गोंधळ वगळता शिस्तीत त्यांनी लस घेतली. लसीकरण केंद्र चौथ्या मजल्यावर आहे. मात्र लिफ्टची सोय असल्याने काही क्षणात केंद्राजवळ जाता येत. याठिकाणी भारतीय जैन संघटना, सीवायडीअे आणि शिला साळवे ट्रस्टचे स्वयंसेवक त्यांना रांगेत बसवत असल्यामुळे केंद्रावर गोंधळ होताना दिसत नाही.

हेही वाचा: रुग्णांना बेड्स देण्यासाठी दोन पुणेकरांनी सुरू केलं स्टार्ट-अप

ऑनलाइन नोंदणीमुळे हस्तक्षेप ऑफलाइन

राजीव गांधी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्‍यक असल्यामुळे येथील राजकीय पुढाऱ्यांना हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे गोंधळ न होता सर्वांचे लसीकरण वेळेत होत असल्याचे दिसून येते. अशीच पद्धत ४५ वर्षांपुढील वयोगटासाठी सुध्दा राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वस्त्यांमध्ये लसीकरणाचे अत्यअल्प प्रमाण

लसीकरणासाठी वस्त्यांमधील नागरिकांची मोठी उदासिनता दिसून येते. त्यामुळे आता पर्यंत झालेल्या लसीकरणात वस्त्यांमधील ४५ वर्षांपुढील वयोगटातील सहव्याधी व ज्येष्ठ नागरिकांचे अत्यअल्प प्रमाण असल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरसेवकांनी वस्त्यांमधील लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: रुग्णवाहिका चालकांच्या पगारामध्ये दरमहा चार हजारांची वाढ

loading image