Union Budget 2021 : लघुउद्योजक आणि करनियमांबाबत काय आहेत येणाऱ्या बजेटकडून अपेक्षा ?

Union Budget 2021 : लघुउद्योजक आणि करनियमांबाबत काय आहेत येणाऱ्या बजेटकडून अपेक्षा ?

मुंबई, ता. 30 :  नव्या कंपन्या उघडताना व चालवताना त्यांच्या क्लीष्ट करनियमांची पूर्तता करण्यातच छोट्या उद्योजकांचे श्रम खर्ची पडतात व त्यांना व्यवसायावर लक्षच देता येत नाही. त्यांना क्लिष्ट करजंजाळात अडकवण्याऐवजी व्यवसाय करू द्यावा. तरच तो मोठा उद्योजक होईल व देशाची अर्थव्यवस्था वाढविण्यास हातभार लावेल, असे मत सनदी लेखापाल चिराग राऊत यांनी सकाळ कडे व्यक्त केले.

सरकारने कररचना, उद्योग या क्षेत्रातील काही गोष्टी जरूर `सरल` केल्या आहेत, मात्र इझ ऑफ डुईंग बिझनेस अजून म्हणावे तेवढे सार्वत्रिक झाले नाही. त्यामुळे कंपनी सुरु करताना दहा ते पंधरा रजिस्ट्रेशन करा, नंतर शंभर पानी रिटर्न फाईल करा, ताळेबंद (बॅलन्सशीट) चार-पाच सरकारी खात्यांमध्ये द्या, अशी आव्हाने लघुउद्योजकांपुढे उभी राहतात. ते करण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी माणसेही नसतात, सुरुवातीला धंदा झाला नाही म्हणून जीएसटी चे रिटर्न भरले नाहीत तर रोज पन्नास रुपये दंड असतो. लघुउद्योजक या करनियम पूर्ततेच्या जाळ्यात अडकला तर तो आपला व्यवसाय करणार तरी कधी. या बाबींकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. 

जीएसटी पोर्टलमध्ये मोठीच गुंतागुंत असल्याने लोक त्याला कंटाळले आहेत. पोर्टल खराब असल्याने रिटर्न भरतानाही अडचणी येतात. या कररचनेत काही सुधारणा झाल्या आहेत, पण त्या अजून मोठ्या प्रमाणात केल्या पाहिजेत. इ वे बिल भरणे देखील छोट्या व्यापाऱ्यांना जमत नाही. सरकारने नव्या उद्योजकांना व स्टार्टअप ना बळ दिले पाहिजे. कंपनी उघडण्यासाठी कंपनी कायदा, पीएफ, पॅन-टॅन क्रमांक, जीएसटी क्रमांक, ट्रेडमार्क आदी पंधरा रजिस्ट्रेशन लागतात. हल्ली एका दिवसात कंपनी रजिस्टर होऊ शकते. पण त्यासाठी सल्लागाराची आवश्यक्ता आहे, लोकांना या प्रक्रियेची माहिती नसल्याने ती सोपी झाली पाहिजे. 

कंपनी चालविण्याबरोबरच ती बंद करणे हे देखील कठीण असते, ती प्रक्रिया देखील सोपी व्हावी. खरोखरीच छोटी उलाढाल असलेल्या लघुउद्योजकांना जास्त फायदे-सवलती द्याव्यात. त्यांचे मोठ्या कंपन्यांकडून असलेले येणे अडकून राहते ही मोठी समस्या आहे. या लघुउद्योजकांना अशा करनियम पूर्ततेच्या जंजाळात अडकवून टाकले तर तो मोठा होणारच नाही. अशी लेट फी, नॉन कंप्लायन्स यात अडकलेले अनेक जण धंदा सोडून देतात. त्यापेक्षा त्याला सुरुवातीला व्यवसाय करू द्यावा, तो मोठा झाला की करही भरेल व सर्व क्लिष्ट नियमांची पूर्तताही करेलच. चीनमध्ये अशा नवउद्यमींना सर्व प्रकारची मदत केली जाते, आपण करप्रणाली सोपी केली तर चीनशी स्पर्धा करू शकू. हे लघुउद्योजकच उद्या मोठे उद्योजक होणार असल्याने सरकारने आधीच त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

वैद्यकक्षेत्रावर भर

कोविडच्या फैलावामुळे आता या अर्थसंकल्पात वैद्यक तरतूदींवर भर हवा. रुग्णालयांची संख्या, आरोग्यसुविधा, गरीबांवर उपचार आदी आरोग्यसेवेची तरतूद वाढवायला हवी. अशीच मोठी साथ पुन्हा आली तर त्याला तोंड देण्याची रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी तरतूद करावी, असेही ते म्हणाले. 

आयकर सवलती

गृहकर्जावर मिळणारी आयकर सवलत ही राज्यांनुसार वेगवेगळी करावी. कारण मुंबईत एक कोटींची घरे असल्याने त्याच्या कर्जाचे व्याज दहा लाखांपर्यंत जाते, पण करसवलत फक्त दोन लाखांचीच असते. ती वाढवली पाहिजे, पण इतर लहान राज्यांमधील शहरांमध्ये महाग घरे नसल्याने त्यांना सध्याची दोन लाखांची सवलत पुरेशी होऊ शकेल. अमेरिकेत वैयक्तिक आयकरदात्यांचे रिटर्न भरणे पुष्कळ सोपे असते. आपल्याकडे मात्र शेकडो प्रश्न विचारले जातात. एकंदरीतच कर कमी केले तर लोक आपणहून कर भरतील, त्यातही लोक करांना नाही तर क्लिष्टतेला आणि नोकरशाहीला घाबरतात, असेही राऊत यांनी दाखवून दिले.

union budget 2021 expectations of chirag raut regarding small entrepreneurs and taxation policies

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com