Railway: नाशिक-मुंबई प्रवास सुपरफास्ट! रेल्वे वाहतूक कोंडी फुटणार, कसारा- मनमाड तिसऱ्या-चौथ्या मार्गाला मंजुरी; कधी होणार पुर्ण?

Kasara-Manmad New Railway Line: कसारा- मनमाडदरम्यान नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे. लवकरच अभियांत्रिकी कामे सुरू हाेणार असून यामुळे रेल्वेची वाहतूक कोंडी फुटणार आहे.
Kasara-Manmad New Railway Line

Kasara-Manmad New Railway Line

ESakal

Updated on

मुंबई : कसारा- मनमाडदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सुमारे १० हजार १५४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात २४ किमी लांबीचा सर्वात मोठा बोगदा उभारला जाणार आहे. १३१ किमी लांबीचा हा प्रकल्प ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतून जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार असून, घाट विभागातील रेल्वे वाहतुकीची काेंडी फुटण्यास मदत हाेणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com