प्रमुख स्वामीं महाराजांचे समाजाला दिशादर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • ९८ व्या जयंतीदिनानिमित्त कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहांचे प्रतिपादन

नवी मुंबई : आपल्या कार्यातून धर्माचे मर्म संपूर्ण समाजाला समजावून सांगून प्रबोधनात्मक दिशा देण्याचे काम परमपूज्य प्रमुख स्वामींनी केले. त्यांनी शिकवलेल्या विचारांचे आचरण करीत समाज सुधारू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. बीपीएस स्वामिनारायण संस्थेचे गुरू प्रमुख स्वामी महाराज यांच्या ९८ व्या जयंतीदिनानिमित्ताने नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात शहा बोलत होते.    

स्वतःच्याऐवजी दुसऱ्यांचा विचार करणे, स्वतःऐवजी समाजाचा व देशाचा विचार हाच धर्म आहे. व्यक्तीने स्वतःला समाजाला वाहून देणे हाच खरा धर्म आहे, अशी तीन विचारांची शिकवण प्रमुख स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांना देत असत. प्रमुख स्वामी यांनी हिंदू संस्कृतीचा वसुदैव कुटुंबकम्‌ हा सदेश जगभर पसरण्याचे महत्त्वाचे काम केल्याचा पुनरुच्चार शहा यांनी केला. ५५ हजारपेक्षा जास्त तरुणांना आपल्या आयुष्यातील एक कोटी २० लाख दिवस समाजहितासाठी देणारे प्रमुख स्वामी एकमेव आहेत. ६ लाख २० हजारपेक्षा जास्त सत्संग सभा घेऊन त्यांनी समाजाला अध्यात्माची दिशा देण्याचे काम केल्याचे कौतुकोद्गार शहा यांनी केले. प्रमुख स्वामींचे वैयक्तिक आयुष्यात लाभलेल्या मार्गदर्शनाच्या आठवणींनाही शहा यांनी उजाळा दिला. व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या चढउतारात प्रमुख स्वामींचे मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद मला लाभल्याचे शहा यांनी सांगितले. डी. वाय. पाटील स्टेडियमवर स्वामिनारायण संस्थेतर्फे प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्ताने भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला मुंबई, नवी मुंबई, गुजरात, राजस्थान आणि परदेशातून तब्बल ४५ हजारहून जास्त भक्त आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Amit Shah's rendering of the program on the occasion of the 98th BIRTH anniversary of pramukh swami maharaj

फोटो गॅलरी