Kapil Patil : पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी केंद्रीयमंत्री झाले वाढपी; टिफीन बॉक्स बैठकीत कपिल पाटलांचा साधेपणा

Kapil Patil
Kapil Patil

कल्याण : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्यातील साधेपणाचे दर्शन घडवले. मोदी @९ कार्यक्रमांतर्गत कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या टिफीन बॉक्स बैठकीत कपिल पाटील चक्क कार्यकर्त्यांना जेवण वाढताना दिसून आले.

Kapil Patil
Ajit Pawar : अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' सप्ताह म्हणून होणार साजरा; तटकरेंची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांतील विकासकामांची, विविध योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी भाजपातर्फे मोदी@९ कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. भिवंडी लोकसभेच्या ६ विधानसभा मतदार संघातही या उपक्रमाअंतर्गत नागरिकांबरोबर संवाद साधण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणात टिफीन बॉक्स बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Kapil Patil
Viral Video : मिटकरी पाया पडले अन् जयंत पाटलांनी पवारांसमोरच दिला कानमंत्र

या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिड महिना मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता कपिल पाटील यांनी स्वतः यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आपुलकीने जेवण वाढल्याचे दिसून आले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या या कृतीने कार्यकर्त्याची मने तर जिंकलीच. पण त्याचसोबत नागरिकांकडूनही त्यांच्या या साधेपणाचे कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com