व्वा ! असं काही पाहिलं की खूप भारी वाटतं.. अजिबात चुकवू नका !

शर्मिला वाळुंज
Saturday, 28 December 2019

100 टक्के सांगतो तुम्ही अशी निमंत्रणपत्रिका पाहिली नसेल.. 

ठाणे : 'पर्यावरण बचाव'चा संदेश देण्याचे काम अनेकजण करतात. मात्र, हा संदेश आपल्या कृतीतून पोहचविण्याचा प्रयत्न करणारे विरळाच. बदलापूर येथील गिरीश त्रिवेदी यांनी मात्र पर्यावरण संवर्धनाचा वसा आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेतही जोपासला आहे.

लग्नपत्रिका देखणी, आकर्षक करण्याचा उत्साह प्रत्येक घरामध्ये पहायला मिळतो. परंतु, त्रिवेदी यांनी चक्क वहीच्या मुखपृष्ठावर आमंत्रणपत्रिका छापून लग्नानंतरही या आमंत्रणाचा पर्यावरणपूरक वापर कसा होईल हे पाहिले आहे. ही "आमंत्रणवही' पाहिल्यानंतर, प्रत्येक जण त्याचे कौतुक करत आहेत. 

महत्त्वाची बातमी:  UT Is Mean ? वर्षा बंगल्याच्या भींतीवर 'हे' लिहिलं कुणी?

मुळचे राजस्थानचे असलेले आणि बदलापूर येथे रहाणारे गिरीश त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा विवाह नुकताच पार पडला. गिरीश त्रिवेदी यांचे वडील वसंत त्रिवेदी हे स्वातंत्र्यसैनिक होते. पर्यावरणपूरक दृष्टीने, तसेच पेपरलेस लग्नपत्रिका आपल्या मुलाची असावी हा विचार पहिल्यापासूनच गिरीश यांच्या मनात घोळत होता.

महत्त्वाची बातमी:  'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...

आजकाल लग्नपत्रिकेवर वारेमाप पैसे खर्च केले जातात. ही महागडी लग्नपत्रिका हातात पडल्यावर त्या वेळेपुरते केवळ त्या लग्नपत्रिकेचे कौतुक होते व लगेच तिचे रुपांतर रद्दीमध्ये होते. आपल्या मुलाची लग्नपत्रिका रद्दी न होता तिचा वापर व्हावा यादृष्टीने ती वहीवर छापण्याची संकल्पना मी मांडली आणि त्याला घरातल्यांनीही पसंती दर्शविल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी: मुंबईकरांनो मटन खाताय? जरा थांबा, कारण..

गुजराती आणि मराठी अशा दोन भाषांत ही पत्रिका छापण्यात आली आहे. साधारण एका पत्रिकेला 30 रुपये खर्च आला. या पत्रिकेमध्ये वधू-वरांच्या नावासह घरातील तीनही पिढ्यांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे. विशेष करून वराच्या वडिलांच्या पालकांच्या नावासोबतच आईच्याही पालकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.

महत्त्वाची बातमी: स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला

सहसा कोणीही पत्नीच्या आई-वडिलांचे नाव छापत नाही. परंतु, घरातील महिला ही घराचा मुख्य आधार असून त्यांचे पालनपोषण करणाऱ्या पालकांनाही आपण आदराने स्थान दिले पाहिजे, अशी माझी भावना असल्याचे त्रिवेदी सांगतात. 

WebTitle : unique concept of wedding invitation with eco friendly message


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unique concept of wedding invitation with eco friendly message