अनोखी भेट, चांदीच्या शिक्क्यामध्ये राज ठाकरेंची प्रतीमा

पूजा विचारे
Tuesday, 27 October 2020

काल राज ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी राज ठाकरे यांनी चांदीच्या शिक्क्यामध्ये त्याची प्रतिमा असलेलं स्मृतीचिन्ह भेट देण्यात आलं आहे. 

मुंबईः  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोमवारी एक अनोखी भेट मिळाली आहे. काल राज ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी राज ठाकरे यांनी चांदीच्या शिक्क्यामध्ये त्याची प्रतिमा असलेलं स्मृतीचिन्ह भेट देण्यात आलं आहे. 

भेट देण्यात आलेल्या स्मृतीचिन्हात त्यांच्या प्रतिमेशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं रेल्वे इंजिन देखील आहे. 

चांदीच्या स्वरुपात राज ठाकरे यांचं छायाचित्र असलेलं आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं चिन्ह असलेलं स्मृतीचिन्ह तयार करण्याची इच्छा गेल्या काही महिन्यांपासून मनात होती. आता ही इच्छा पूर्णत्वास आल्याची प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार आणि आनंद प्रभू यांनी दिली. 

अधिक वाचा-  नवी मुंबईच्या विकासाला बुस्टर; प्रकल्पांना गती देण्यासाठी ६५० कोटींचा खर्च

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मंदिरं उघडण्याबाबत राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं.  राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?. 

अनलॉक' क्रमांक अमुक तमुक अशा 'अनलॉक' प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असे खडेबोलही सरकारला सुनावले.

Unique gift MNS Chief Raj Thackeray photo a silver stamp


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique gift MNS Chief Raj Thackeray photo a silver stamp