esakal | गल्लीबोळापर्यंत वैद्यकिय मदत पोहोचवण्यासाठी अनोख्या गाड्या, वाहनांमध्ये एक्सरे, कृत्रिम ऑक्सिजन
sakal

बोलून बातमी शोधा

गल्लीबोळापर्यंत वैद्यकिय मदत पोहोचवण्यासाठी अनोख्या गाड्या, वाहनांमध्ये एक्सरे, कृत्रिम ऑक्सिजन

मुंबई शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होतेय ही आनंदाची बाब आहेच. मात्र मुंबईवरील कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलं नाहीये

गल्लीबोळापर्यंत वैद्यकिय मदत पोहोचवण्यासाठी अनोख्या गाड्या, वाहनांमध्ये एक्सरे, कृत्रिम ऑक्सिजन

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबई शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होतेय ही आनंदाची बाब आहेच. मात्र मुंबईवरील कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलं नाहीये. म्हणूनच आता मुंबईत आणखीन एक अनोखा प्रयोग करण्यात येतोय. मुंबईच्या गल्लीबोळापर्यंत वैद्यकिय मदत पोहचण्यासाठी तीनचाकी वैद्यकिय गाड्या महापालिकेच्या ताफ्यात आल्या आहेत. या वाहनांमध्ये एक्सरे, कृत्रिम ऑक्सिजन अशा काही महत्त्वाच्या सुविधा आहेत.

एकूण तीन वाहनांपैकी दोन वाहने प्राणवायू सुविधेसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीसह सुसज्ज आहेत. तर तिसरं वाहन हे कोविड चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांनी आणि  क्ष-किरण (X Ray) यंत्रासह सुसज्ज आहे. ही तीनही वाहनं तीन चाकी असून आकाराने छोटी आहेत. ज्यामुळे अरुंद रस्त्यांवर देखील या वाहनांचा उपयोग करणे तुलनेने सुलभ असणार आहे. ही वाहनं 'मुरली देवरा फाऊंडेशन' आणि 'गोदरेज कंपनी' यांच्यामार्फत देण्यात आली आहेत. माजी खासदार मिलींद देवरा, आमदार अमिन पटेल यांनी आज या गाड्या महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाा सुपूर्द केली.

मोठी बातमी मुंबईतील तब्बल 'इतक्या' लोकांना कोरोना झाल्याचे कळलेही नाही; कारण की....

रेल्वे स्थानकात स्वयंचलित व्हेंडिंग मशीन

नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रशासनानं मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. तसंच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचाही वापर करण्यास सांगितलं आहे. मात्र एखाद्या वेळेस तुम्ही घरातून निघताना मास्क किंवा सॅनिटायझर विसरलात तर चिंता करु नका, कारण आतापासून मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी मध्य रेल्वे स्थानकात स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोव्हज देण्याचा निर्णय घेतला आहे.  या व्हेंडिंग मशीनमधून तुम्हाला मास्क, सॅनिटायझर आणि हॅंड ग्लोव्हज  सहज उपलब्ध होणार आहेत. 

unique three wheeler vehicles are in the fleet of BMC to fight against Covid19

loading image