मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु,अशी करा ऑनलाईन नाव नोंदणी

मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु,अशी करा ऑनलाईन नाव नोंदणी

मुंबईः  मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व नोंदणी सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलीय. तसंच पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. पहिली प्रवेश यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणारेय.  पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य असणारेय. 

१६ जुलैला बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले.  मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम विद्यापीठाकडे प्रवेश पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी १८ जुलैपासून सुरू झाली असून ४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ही नोंदणी करता येणार आहे. 

८ जुलैपासून विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी सुरू केली असून आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास ०२०-६६८३४८२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलंय. 

पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अंतर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मुळ प्रती सादर केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाईल.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • अर्ज विक्री-  २४ जुलै ते ४ ऑगस्ट
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया- २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२०  (दु.१ पर्यंत)
  • प्रवेश अर्ज सादर करणे-  २७ जुलै ते ४ ऑगस्ट, (३ वाजेपर्यंत)  (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
  • पहिली गुणवत्ता यादी- ४ ऑगस्ट ( सायंकाळी ७.०० वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - ५ ते १० ऑगस्ट, (दु ३ पर्यंत)
  • दुसरी गुणवत्ता यादी- १० ऑगस्ट (७ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - ११ ते १७ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • तिसरी गुणवत्ता यादी- १७ ऑगस्ट (७ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – १८ ते २१ ऑगस्ट

एखाद्या विद्यार्थ्यांस प्रवेशासाठीच्या तांत्रिक सुविधेसाठी अडचणी आल्यास त्यांने त्याच्या नजीकच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2020-21) या लिंकवर क्लिक करावे, असा विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.

university of mumbai admission form 2020 schedule released apply till august 4 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com