उल्हासनगरच्या मदतीला थेट बंगळुरू; कोविडग्रस्तांसाठी अनोखा उपक्रम... 

उल्हासनगरच्या मदतीला थेट बंगळुरू; कोविडग्रस्तांसाठी अनोखा उपक्रम... 

उल्हासनगर : उल्हासनगर पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या निर्देशान्वये आपापल्या निवासस्थानी होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोविड रुग्णांचे बळ, मनोधैर्य, मानसिकरीत्या सक्षम करण्याच्या उद्देशाने बंगळुरूमधील योसेड या प्रसिद्ध एनजीओ संस्थेचे दूरध्वनी समुपदेशक पथक सज्ज करण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कोविड रुग्णालयात बेड्सची संख्या कमी असून त्याअनुषंगाने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशा रुग्णांत जनजागृती करून त्यांच्या प्रकृतीची  विचारपूस करण्यासाठी योसेड ही संस्था विनामूल्य कार्य करणार आहे. तसेच अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना मदत करणार आहे. कोविड ग्रस्तांचे मानसिक बळ, मनोधैर्य, मानसिकता सक्षम करण्याचा यामागे उद्देश आहे.

योसेड संस्थेला यापूर्वी भिवंडीमध्ये काम करण्याचा अनुभव असून त्यात त्यांना यश आले आहे. त्याअनुषंगाने संस्थेचे दूरध्वनी समुपदेशक पथक तयार करण्यात आले आहे. होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांशी ही संस्था दूरध्वनीद्वारे सातत्याने संपर्क साधणार आहे. अत्यावश्यक असलेल्याना विनामूल्य मदत करणार आहे. पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्ण संसर्गजन्य आजारातून तात्काळ बरा होण्यासाठी ही योजना फलदायी ठरणार असा विश्वास जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला आहे.

सदर माहिती ही कोरोनाने बाधित, सौम्य लक्षणे असल्याने घरीच क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना देण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

NGO of Bangalore to give their support to the covid patients of ulhasnagar check how


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com