Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ

Unmasking Happiness | कोरोनामुक्त 80 टक्‍के रुग्णांमध्ये केसगळती; BMC रुग्णालयांत तक्रारींच्या संख्येत वाढ

मुंबई  : कोरोनातून बरे झालेल्या ८० टक्के जणांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शिवाय, ज्यांना कोरोना झालेला नाही अशांसमोर मानसिक ताणातून केसगळती होत असल्याचे पालिकेच्या रुग्णालयांत झालेल्या तपासणीत आढळले आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोरोनोत्तर (पोस्ट कोव्हिड) उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये केसगळतीची समस्या उद्‌भवली आहे. या संख्येत वाढ होत असल्याचे केईएम रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखलकर यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात केसगळतीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भर पडली आहे. त्यात कोरोना महासाथीत केसगळतीची समस्या निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोव्हिडमुळे अनेकांना केसगळती होत आहे. ज्यांना कोव्हिड झाला आहे तेही आणि ज्यांना नाही झाला त्यांनाही या समस्या जाणवत आहेत.
- डॉ. स्मिता घाटे,
 त्वचारोग तज्ज्ञ, सायन रुग्णालय


कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि त्यातून किमान दीड ते तीन महिन्यांदरम्यान केसगळतीची समस्या होते.
- डॉ. चित्रा नायक,
विभागप्रमुख, त्वचा रोग, नायर रुग्णालय

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांनी साधारण तीन महिन्यांनंतर केस गळतीच्या तक्रारी केल्या आहेत. कोरोना काळात वाढलेल्या तणावातून केसगळती होऊ शकते, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयात त्वचा विकारावरील उपचारांसाठी येणाऱ्या २५० रुग्णांमधील ३० टक्के रुग्णांनी केसगळतीची तक्रार केली आहे. व्हिटॅमिन डी, लोहाचे प्रमाण कमी झाल्यास केसगळती उद्‌भवते.
- डॉ. सिद्धी चिखलकर,
सहयोगी प्राध्यापक, त्वचाविकार विभाग, केईएम रुग्णालय

Unmasking Happiness Hair fall in 80% of corona-free patientsIncrease in the number of complaints in BMC hospitals

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com