
कोरोनामुक्त झाल्यानंतरही घरी गेल्यावर रुग्णांना पुन्हा तक्रारी जाणवू लागल्या आहेत. ज्यात फुफ्फुसाच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : कोरोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे फुफ्फुसांना पोहोचते. फुफ्फुसातील उतींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. याचा परिणाम म्हणून व्यक्तीला श्वास घेण्यास अडचणी घेतात. ज्या रुग्णांना रुग्णालयात यंत्राद्वारे प्राणवायू (ऑक्सीजन) पुरविण्यात आला. अशा रुग्णांच्या शरीरात प्राणवायूची कमतरता निर्माण झाल्याचे आजवरच्या निदानात स्पष्ट झाले आहे. अशा रुग्णांमध्ये फुफ्फुसांसंबंधित अनेक आजार आढळून येत आहेत.
कोरोनामुक्त झाल्यानंतरही घरी गेल्यावर रुग्णांना पुन्हा तक्रारी जाणवू लागल्या आहेत. ज्यात फुफ्फुसाच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कोव्हिडमुक्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी श्वासाचे व्यायाम, प्राणायाम, थोड्या अंतरापर्यंत झपझप चालत जाणे महत्त्वाचे आहे. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. या वेळी काही त्रास झाल्यास डॉक्टरांशी तातडीने संपर्क करण्याची गरज डॉक्टरांनी बोलून दाखवली.
कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये फुफ्फुसांना इजा (स्कारिंग) पोहोचली आहे. अशा रुग्णांसाठी पुनर्वसन कार्यक्रमांची गरज असल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले.
अडथळे असे
ज्यांना यंत्राद्वारे अधिक काळ प्राणवायू पुरविण्यात आला. अशा रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा होण्याची प्रकरणे वाढली आहेत. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे आदी त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील काही कोव्हिडमुक्त रुग्णांना पुन्हा ऑक्सिजनवर ठेवावं लागत आहे.
श्वास कसा घ्यावा?
एका ठिकाणी शांत बसावं. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. हळुहळु नाकाने श्वास घ्यावा आणि तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर तो तोंडाने घ्यावा. या व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं असेल, तर व्यायाम करताना कोणालातरी सोबत ठेवावं.
....
सीटीस्कॅनद्वारे रुग्णांच्या फुफ्फुसाचे आरोग्य सुधारत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा यात समावेश करुन घेतला पाहिजे. आहारात थंड काहीच घेऊ नये. कोव्हिडवरील लस घेणे गरजेचे. ज्यांना 10 पावले चालले तरी प्राणवायूची गरज भासते. त्यामुळे, लोकांनी ऑक्सिजन पातळी नियमित तपासली पाहिजे.
-डॉ. नितीन कर्णिक,
प्राध्यापक आणि औषध विभागप्रमुख, सायन रुग्णालय
Unmasking Happiness Lung Health in Post Covid
----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )