Unmasking Happiness | राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई लढणारे राजेश टोपे हे दिशादर्शक लढवय्ये!

Unmasking Happiness | राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई लढणारे राजेश टोपे हे दिशादर्शक लढवय्ये!

महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले, राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी आली. डॉक्‍टरांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न ते समजावून घेत असतानाच कोरोनाचे संकट आले. राजेश टोपे यांच्या मातोश्री आजारी असताना, कोरोना संसर्गाने राज्याला वेढले होते. टोपे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ समजून कामाला लागले आणि राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई ते लढत राहिले.

देशात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर राज्य शासन अधिक सतर्क झाले. मॉल, चित्रपटगृहे, शाळा, कार्यालये बंद करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेतला. कोरोना विषाणू आजाराच्या निदानाची व्यवस्था सुरुवातीला केवळ पुण्यात एकाच ठिकाणी उपलब्ध होती. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर येथेही सुविधा निर्माण करण्यात आली.
कोरोनाकाळात राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले. कोरोनाची साथ नियंत्रणासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेस विशेष अधिकार मिळाल्याने निर्णय गतिमान पद्धतीने घेण्याच्या प्रक्रियेत सुलभता आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली. राज्यात ३,७८७ रुग्णालयामध्ये ३.६३ लाख एवढे बेडस्‌ उपलब्ध आहेत. यातील ५९ हजार ५४४ बेडस्‌ हे ऑक्‍सिजन सपोर्टेड बेडस्‌ आहेत. तसेच राज्यात ८,१५८ व्हेंटिलेटरची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. साधनसामुग्रीची उपलब्धता करतानाच कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर्स, नर्स अन्य आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही राजेश टोपे यांनी केले.

राज्य शासनाने नागरिकांना मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे या सूचनांचा अवलंब करण्याचे आवाहन सातत्याने केले. कोरोनावर उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांनी मात केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेण्यासाठी त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यशस्वीरीत्या राबविली. त्या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसोबतच प्रतिबंधात्मक उपायांचा संदेशही त्यातून देण्यात आला. रोगनिदान आणि रोग उपचार यामध्ये सर्वसामान्य जनतेची आर्थिक परवड होऊ नये, याकरिता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य देशात ठरले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने दरआकारणी केली जात असताना, तिला चाप लावण्याचा धाडसी निर्णय राज्य शासनाने घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी खाटा राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावरदेखील नियंत्रण राहण्यास मदत मिळाली आहे.

Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम, आहार, व्यायामाकडे लक्ष देण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

खासगी प्रयोगशाळांच्या तसेच सीटी स्कॅनच्या शुल्कावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयात रेमडेसिवीर हे इंजेक्‍शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले. खासगी रुग्णालयातही या इंजेक्‍शनची किंमत २,३६० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात असून खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी ४,५०० वरून ७०० रुपये इतका दर निश्‍चित करण्यात आला आहे. शासनाने किमान चार वेळा चाचण्यांच्या दरात कपात करून सामान्य रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचारासाठी ‘टेलिआयसीयू’ सुविधेचा वापर केला आहे.

कोरोना साथ आटोक्‍यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्‍चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा, यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत; तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळत आहे. यासारख्या अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णयांनी रुग्णांना दिलासा दिला आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Unmasking Happiness Rajesh Tope who is fighting against Corona in the state mumbai marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com