शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

समीर सुर्वे
Friday, 30 October 2020

प्रशात महासागरात सध्या निर्माण झालेला परीणाम म्हणजे ला निनो परीणाम आहे. यात समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे.

मुंबई : प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. या परीणामुळे दक्षिण आशियायी देशांमध्ये  यंदा जास्त पाऊस झाला आहे.

भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला आहे. ऑक्टोबरच्या सुरवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या प्रवासाला खिळ बसली. असे असले तरी मान्सून काळातच भारतीली बहूतांश भागात सरीसरीपर्यंत अथवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूूत आहे. प्रशांत महासागरात विषुववृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे. त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशियायी देशांकडे वाहत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. तर, हा परीणाम फेब्रुवारीपर्यंत राहाणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे असे जेष्ट कृषी हवामान तंज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

'ला निनो 'परीणाम 

प्रशात महासागरात सध्या निर्माण झालेला परीणाम म्हणजे ला निनो परीणाम आहे. यात समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे.

कमी दाबाचा पट्टा कसा निर्माण होतो

ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो. तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्राकार स्थिती तयार होतेे. त्यातून वादळाची निर्मीती होते.  

( संपादन - सुमित बागुल )

unseasonal rain will remain in maharashtra till February 2021 says ramchandra sabale


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unseasonal rain will remain in maharashtra till February 2021 says ramchandra sabale