
मरिन ड्राईव्ह येथे 27 वर्षीय तरुणाने तीन पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईशी भांडण झालं, घरातून चाकू घेऊन 'तो' निघाला आणि म्हणाला "आज कुणालातरी संपवतोच..."
मुंबई : मरिन ड्राईव्ह येथे 27 वर्षीय तरुणाने तीन पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय करण प्रदीप नायर असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो बेरोजगार आहे. वास्तुविशारदक असलेल्या हा तरूण कंबाला हिल येथील उच्चभ्रू वस्तीतील रहिवासी आहे.
बदली झाल्यानंतर माजी महापालिका आयुक्त परदेशी यांनी घेतला 'हा' निर्णय, जाणार...
मरिन ड्राईव्ह येथील फुटपाथवरून तो शनिवारी पहाटे चाकू घेऊन फिरत होता. त्यावेळी बोट क्लबजवळ नाकाबंदीमध्ये तैनात पोलिसांनी या तरुणाला पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता तरुणाने चाकू फिरवण्यास सुरूवात केली. त्याने एका पोलिसाच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्वतःला वाचवल्यामुळे या पोलिसाच्या खांद्यावर जखम झाली आहे. त्यानंतर त्याने इतर दोन पोलिसांवर चाकूने वार केला. त्याच्या हातावरही जखमा झाल्या आहेत.
पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक सचिन शेळके व शिपाई सागर शेळके असे जखमी पोलिसांचे नाव आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरोपी तरुणाने घर सोडण्यापूर्वी त्याच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर घरातून निघताना आज कोणाला, तरी मारेन, अशी धमकी देऊन तो चाकू घेऊन घरातून बाहेर पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली 'ही' मागणी...
झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणारा मोठा चाकू आरोपीकडे होता. तरी पोलिस या हल्ल्या मागील नेमके कारण पोलिस जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडील चाकू जप्त केला आहे. लॉकडाऊनचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबतही पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कर्मचा-यावर हल्ला करणे, संचारबंदीचे उल्लंघन आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयापुढे लवकरच हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
unstable man attacked mumbai police after police asked him to stop on marine drive
Web Title: Unstable Man Attacked Mumbai Police After Police Asked Him Stop Marine Drive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..