Rain Update Maharashtra I पुढील 3-4 तासांत रायगड, नाशिक, पुणे घाटात मुसळधार पावसाची शक्यता - IMD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update Maharashtra

मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक काही भागातही पाऊस पडेल - IMD

पुढील 3-4 तासांत रायगड, नाशिक, पुणे घाटात मुसळधार पावसाची शक्यता - IMD

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम घाटतही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असून पाऊस सक्रिय झाल्याने कोकणपट्ट्यात अतिवृष्टी होत आहे. (Rain Update Maharashtra)

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आता रायगडच्या काही भागासह नाशिक-पुणे घाट परिसरात आणि लगतच्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुन्हा एकदा जोरदार सरी कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पुढील 3 ते 4 तासांत या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: 'सत्तेच्या लालसेपोटी भाजपनं महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं पाप केलंय'

दरम्यान, दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत दाट ढग जमा झाल्यामुळे कोकण-गोवा आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. तर, मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आदी भागातही पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या परिसरात पुढील तीन-चार तासांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासून मुंबईत दमदार पाऊस पडला आहे. मुंबईत सरासरीपेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली. तसेच पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा: संसदेच्या नव्या इमारतीवर ६.५ मीटरचा अशोक स्तंभ, PM मोदींनी केलं उद्घाटन

Web Title: Upcoming 3 4 Hours Heavy Rain In Nashik Pune Raigad Says Imd Rain Update In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..