उरणमध्ये आणखी 2 जण कोरोनाबाधित तर इतक्या जणांची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

उरणमध्ये कोरोनामुक्त होण्याची संख्या दिवसागणीक खूप वेगाने वाढत असल्याने उरणकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

उरण : उरणमध्ये कोरोना वाढत आहे; पण त्याही अधिक वेगाने रुग्णांची त्यावर मात होत आहेत. आज आलेल्या अहवालानुसार उरणमधील करंजा येथील 43 वर्षीय व नागाव येथील 59 वर्षीय असे दोन रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत.

हे ही वाचा : सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

दोघेही कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु, आज उरणमधील 19 व्यक्तींनी कोरोनाला हरवल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उरणमध्ये कोरोनामुक्त होण्याची संख्या दिवसागणीक खूप वेगाने वाढत असल्याने उरणकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

In Uran, 2 more people were infected with coronavirus and 19 corona free


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Uran, 2 more people were infected with coronavirus and 19 corona free

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: