सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महापालिकेने अवघ्या 9 दिवसात डेंगीच्या डासांचे 1 हजार 146 अड्डेे आणि मलेरीयाच्या डासांचे 333 अड्डे नष्ट केले आहेत.

मुंबई : कोरोना बरोबरच मुंबईत आता डेंगी आणि मलेरीयाचा ताप वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने अवघ्या 9 दिवसात डेंगीच्या डासांचे 1 हजार 146 अड्डेे आणि मलेरीयाच्या डासांचे 333 अड्डे नष्ट केले आहेत.

महापालिकेच्या किटक नाशक विभागाने 13 मे पासून ही मोहिम सुरु केली आहे. 1 हजार 500 कर्मचारी कोरोनाच्या साथीतही जिव धोक्यात घालून डांसांचे अड्डे नष्ट करत आहेत. गुरुवार (ता.21) पर्यंत झालेल्या तपासणीत डेंगी  पसरवणार्या एडिस इजिप्ती डासाच्या अळ्या 1 हजार 146 ठिकाणी सापडल्या आहेत. तर मलेरीया पसरवणाऱ्या एॅनाफिलीस स्टिफेनी डासांच्या अळ्या 333 ठिकाणी सापडल्या आहेत. याबाबत किटकनाशक  विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी माहिती दिलीये.

कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर आणि त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या मधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. पालिकेचे कर्मचारी स्वतःचा जिव धोक्यात घालून संपुर्ण शहरात फिरत आहे. धोकादाय परीस्थीतीत तपासणी करुन अळ्या नष्ट करत आहेत. पावसाळ्या पुर्वी मोठ्या प्रमाणात अळ्या सापडत असल्याने नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

फ्रिजमध्ये आढळतोय डेंगीचा डास 

सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणा-या ताटल्या,एसी , फ्रिजची  डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली आहे.अशी माहिती महापालिकेकडून देणात आली. 

मोठी बातमी - तुमच्या घरात बसण्याची किंमत अब्जावधींत...

 गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितली असता एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणा-या 'एडीस इजिप्टाय' डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणा-या या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरीयाचा डास विहीरी, कुलिंग टॉवर, कारंजे, पाण्याचे हौद, इमारत बांधकांच्या ठिकाणी आढळत आहेत.

BMC sanitized more thane one thousand malaria mosquito spots in mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC sanitized more thane one thousand malaria mosquito spots in mumbai