

MMRDA Metro 10
ESakal
मुंबई : गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, मिरागाव या 'मेट्रो १०' प्रकल्पासह घोडबंदर रस्ता रुंदीकरणाच्या सुधारित प्रस्तावाला नगरविकास विभागाने गुरुवारी (ता. २०) औपचारिक मंजुरी दिली. या संपूर्ण प्रकल्पासाठी ८ हजार ५२५.४९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. यापूर्वी या मेट्रो प्रकल्पाची किंमत ४४७६ कोटी असून त्यात ७८१९.५३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा गायमुख ते फाऊंटन हॉटेलदरम्यान ५.४ किलोमीटर घोडबंदर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत रुंदीकरणासाठी ७१५.९६ कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.