आज उर्मिला मातोंडकर 'हाता'वर बांधणार शिवबंधन ? पत्रकार परिषदेत होणार महत्त्वाचा खुलासा

सुमित बागुल
Tuesday, 1 December 2020

राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी काँग्रेसदेखील उत्सुक होती

मुंबई : शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस झाली आणि त्यानंतर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आज उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत असं बोललं जातंय. मात्र उर्मिला आज खरंच शिवसेनेत प्रवेश करणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

२०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्यावेळी काँग्रेसच्या 'हाता'वर निवडणूक लढणाऱ्या उर्मिला मातोंडकर आज स्वतःच्या हातावर शिवबंधन बांधून घेणार अशा अनेक बातम्या समोर आल्यात. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला मातोंडकर या आज आधी पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये त्या आपल्या राजकीय वाटचालीबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे. यानंतर उर्मिला या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

महत्त्वाची बातमी चक्क लाच म्हणून अधिकाऱ्याने मागितल्या दोन साड्या, ACB कडून गुन्हा दाखल

शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या आमदारांच्या यादीत उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा समावेश केला गेला. उर्मिला यांच्या नावावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब झाल्यांनतर त्या शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात होतं.

२०१९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवेळी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला केला होता. आपल्या पराभवाचे खापर उर्मिला यांनी काँग्रेसच्या स्थानिक पक्षनेतृत्त्वावर फोडलं होतं. दरम्यान त्यांनतर उर्मिला राजकारणातून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं  होतं. राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी काँग्रेसदेखील उत्सुक होती. काँग्रेसकडून उर्मिला यांना विचारणासुद्धा करण्यात आली होती. मात्र उर्मिला यांनी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर जाण्यास नकार दिल्याचं समोर आलेलं. 

महत्त्वाची बातमी : मध्य वैतरणात बीएमसीचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प; राज्यातील पहिलाच प्रयोग

urmila matondkar to conduct press conference and clear her stand on political roadmap

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urmila matondkar to conduct press conference and clear her stand on political roadmap