उर्मिला मातोंडकर रिटर्न्स ! शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत उर्मिला होणार राजकारणात पुन्हा सक्रिय

सुमित बागुल
Tuesday, 1 December 2020

मातोश्रीवर बांधलं हातावर 'शिवबंधन' !  उर्मिला पुहा सक्रिय राजकारणात 

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सक्रिय राजकारणात पुन्हा प्रवेश करतायत. विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवल्यानंतर उर्मिला यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. उर्मिला यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं खापर फोडलं होतं. त्यांनतर काँग्रेसकडून आलेली विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातील उमेदवारीही उर्मिला यांनी नाकारली होती.

शिवसेनेने उर्मिला यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून उमेदवारीची ऑफर दिली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केल्यानंतर उर्मिला यांनी विधानपरिषदेसाठी होकार होता. त्यानंतर आज उर्मिला यांचा मातोश्रीवर अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. उर्मिला यांनी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई , आदेश बांदेकर यांच्यासह महत्त्वाचे शिवसेनेचे नेते उपस्थित होते.  

महत्त्वाची बातमी कोरोनाचा परिणाम पुढच्या पिढीवरही; कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक

२०२२ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडतायत. या पार्श्वभूमीवर उर्मिला यांचा आज शिवसेनेत झालेला पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. भारतीय जनता पक्षाकडून २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु झालीये. त्यामुळे होऊ घातलेल्या २०२२ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर उर्मिला यांचा पक्षप्रवेश शिसेनेची ताकद वाढवणारा मानला जातोय. 

दरम्यान, आज उर्मिला मातोंडकर या पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजकीय वाटचालीवर माध्यमांना माहिती देणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत उर्मिला काय बोलणार, ठाकरी भाषेत उर्मिला यांची तोफ धडाडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

urmila matondkar joined shivsena big move by shivsena before BMC election


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urmila matondkar joined shivsena big move by shivsena before BMC election