दुपारी एक वाजता उर्मिला यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, पत्रकार परिषदेवर सर्वांच्या नजरा

सुमित बागुल
Tuesday, 1 December 2020

२०१९ मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये उर्मिला यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेच्या कोट्यातून निवड झाली. शिवसेनेकडून उर्मिला विधानपरिषदेवर जाणार या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांनतर उर्मिला उर्मिला या शिवबंधन बांधणार हे जवळपास पक्कं होतं. मात्र कालपर्यंत उर्मिला या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार की नाही याबाबत संभ्रम होता. त्यानंतर आता समोर येणाऱ्या माहितीनुसार आज उर्मिला या दुपारी एक वाजता शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. आता शिवसेनकडून उर्मिला यांना कोणती जबाबदारी सोपवली जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे.  

उर्मिला याआधी पत्रकार परिषद घेऊन आपला राजकीय रोडमॅप उलगडणार असं बोललं जात होतं. मात्र आता उर्मिला या दुपारी एक वाजता मातोश्रीवर आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबाबत माहिती देणार आहेत. 

हेही वाचा : पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर करणार  महत्त्वाचा खुलासा

२०१९ मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये उर्मिला यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र भारतीय जनता पक्षाच्या गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांना पराभूत केलं होतं. आपल्या पराभवाचे खापर उर्मिला यांनी काँग्रेच्या स्थानिक पक्षनेतृत्वावर फोडलं होतं. उर्मिला या त्यानंतर राजकारणापासून अलिप्त राहिल्यात. काँग्रेस पक्षाला उर्मिला यांनी अधिकृतरीत्या सोडचिट्ठी देखील दिली होती.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी काँग्रेसने देखील दर्शवली होती. मात्र उर्मिला यांनी काँग्रेस पक्षाला नकार दिल्याची माहिती आहे. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांना विधानपरिषदेसाठी विचारणा करण्यात आली होती. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी फोनवरून संवाद साध्याल्याचीही माहिती आहे. त्यानंतर उर्मिला यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली होती.

urmila matondkar to officially join shiv sena big move of shivsena before BMC elections  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urmila matondkar to officially join shiv sena big move of shivsena before BMC elections