
रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. पक्ष प्रवेशानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी केलेल्या फोनबद्दल सांगितलं आहे.
मुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. पक्ष प्रवेशानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी केलेल्या फोनबद्दल सांगितलं आहे.
काँग्रेसकडून आलेली विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातील उमेदवारीही उर्मिला यांनी नाकारली होती. शिवसेनेने उर्मिला यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून उमेदवारीची ऑफर दिली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केल्यानंतर त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता.
'आपली जी विधान परिषद आहे महाराष्ट्राची. त्या महाराष्ट्राची परंपरा ही इतकी मोठी आहे की, त्याच्या मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण की ही परिषद, या ज्या जागा आहेत, जी भवनं आहेत. त्याच्यात जायला लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याचा दर्जा खूप वाढायला पाहिजे आणि त्याच्याकरिता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.'
उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा हे म्हणाले आणि विचारचं मला पहिल्यांदा खूप आवडले. तसंच त्यांनी माझा नावाचा विचार केला यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात.
अधिक वाचा- ठाण्यातील मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन
२०२२ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडतायत. या पार्श्वभूमीवर उर्मिला यांचा आज शिवसेनेत झालेला पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. भारतीय जनता पक्षाकडून २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या २०२२ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर उर्मिला यांचा पक्षप्रवेश शिवसेनेची ताकद वाढवणारा मानला जातोय.
आपले आशिर्वाद आपला विश्वास सदैव सोबत रहावा #जयमहाराष्ट्र pic.twitter.com/yhejxjb1QE
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 1, 2020
मुंबई विभागातल्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Urmila Matondkar told about happened the phone call made by Uddhav Thackeray