
मुंबई शहरातील नालेसफाईसाठी एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त करत ही कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी शुक्रवारी (ता. २३) महापालिका प्रशासनाला दिले. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा, असेही निर्देश शिंदे यांनी या वेळी दिले.