झूम ऍप वापरताय... सावधान!  नवी मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा 

झूम ऍप वापरताय... सावधान!  नवी मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा 
Updated on

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे दळणवळणाची साधने बंद झाल्याने नागरिकांचे एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येण्यावर गदा आली आहे. त्यामुळे विविध सोहळे आणि समारंभावर पाणी सोडावे लागत आहे. परंतु माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी नेटकऱ्यांकडून झूम ऍपचा वापर केला जात आहे. मात्र, प्रत्येक बाबतीत एकमेकांशी संपर्क साधण्यास झूम ऍपचा केलेला वापर तुम्हाला नुकसानीच्या खाईत घेऊन जाऊ शकतो, अशी भीती नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने व्यक्त केली आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे सरकारने देशभरात टाळेबंदी घोषित केली आहे. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये आणि कंपन्या बंद पडल्या आहेत. बहुतांश कंपन्यांनी कामगारांना घरातूनच काम करायला सांगितले आहे. अशा परिस्थितीत एकत्र कॉन्फरन्स करण्यासाठी सध्या झूम ऍपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. झूम ऍपवर एकाच वेळेला 50 पेक्षा जास्त जणांना व्हिडीओ कॉलद्वारे जोडता येण्याची व्यवस्था असल्यामुळे शाळा-महाविद्यालये व्हर्च्युअल क्‍लास घेण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. काही कॉर्पोरेट कंपन्याही कॉन्फरन्ससाठी झूम ऍप वापरत आहेत. अलीकडे काही गावांमध्ये हनुमान जयंती आणि देवांच्या आरतीचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठीही ऍपचा वापर केला जात आहे. परंतु ऍपच्या काही प्रायव्हसी फिचरमध्ये काही कमी असल्यामुळे तुम्ही एकमेकांना देत असलेली माहिती तुमच्या न कळत त्रयस्थ व्यक्ती अथवा हॅकर चोरू शकतो, असा संशय नवी मुंबई पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या ऍपच्या प्रायव्हसी सिक्‍युरिटीवर कंपनीच्या तंत्रज्ञान विभागातर्फे काम सुरू आहे. होस्ट बनून संबंधित हॅकर त्याला हवी ती माहिती ऍपवर टाकू शकतो. त्याबाबत झूम कंपनीने दिलेल्या सिक्‍युरिटी टिप्सचा बारकाईने अभ्यास करून ऍपचा वापर करावा, असे आवाहन सायबर सेलने केले आहे

अशी खबरदारी घ्या 
झूम ऍपमधून अत्यंत महत्त्वाच्या मीटिंग घेणे टाळा, त्या सार्वजनिक घेऊ नका, मीटिंगची लिंक समाजमाध्यमावरून पाठवू नका, ज्या व्यक्तीला यूआरएल द्यायची आहे त्यांनाच ती द्या आदी खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com