esakal | मुंबईत लसीकरणावर पालिकेचे लक्ष, केंद्राची संख्या वाढवणार

बोलून बातमी शोधा

bombay municipal corporation
मुंबईत लसीकरणावर पालिकेचे लक्ष, केंद्राची संख्या वाढवणार
sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सोमवारी पालिकेने 69 हजार 577 लाभार्थींची लसीकरण केले असून हे आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण आहे. लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी पालिकेने दिवसाला 1 लाख लाभार्थींची लसीकरण करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या ही वाढवण्यात येणार आहे.

मुंबईत सोमवारी कोव्हीशिल्डचे 66 हजार 006 आणि को व्हॅक्सीनचे 3571असे एकूण 69 हजार 577 डोस देण्यात आले. आतापर्यंत 22 लाख 82 हजार 609 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले असून पालिका 66 % , केंद्र आणि राज्य सरकार 8 % तसेच खासगी 26 % लसीकरण करण्यात आले.

मुंबईत पालिकेची 45 लसीकरण केंद्र कार्यरत असून केंद्र आणि राज्य सरकार 17 तसेच खासगी 73 अशी एकूण 135 लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांवर एकूण 148 सेशन घेण्यात आले.

हेही वाचा: BKC लसीकरण केंद्र पुन्हा बंद, केवळ 10 ते 12 डोस शिल्लक

केंद्र सरकारकडून लसींचा साठा उपलब्ध होत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. सोमवारी सर्वाधिक लसीकरण झाले. 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होणार असल्याने लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. त्यानुसार दिवसाला साधारणता 1 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्याचे लक्ष असल्याचे पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर 2 लाख 77 हजार 096

फ्रंट लाईन वर्कर 3 लाख 17 हजार 352

45 ते 59 वयोगट 7 लाख 92 हजार 717

60 वर्षे वयावरील 8 लाख 95 हजार 455

असे एकूण 22,82,609 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

vaccination of one lakh beneficiaries per day bmc attention