चल वडापाव देतो, चायनिज देतो सांगून तिला घेऊन जायचे आणि...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

चिमुरडीला खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून गेल्या दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. 

टिटवाळा : घोटसई (ता.कल्याण) येथे पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

घोटसई जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वडापावचा धंदा चालविणारा माधव मगर (वय 37) तसेच चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारा विश्वनाथ तरणे (40) हे व्यवसाय करत होते. या दोघांनी या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून गेल्या दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. 

ही बातमी वाचा ः मोबाईलमध्ये महिलेचे केले विवस्त्र चित्रीकरण अऩ्....

अखेर मुलीने आपल्या आईला या बाबत सांगितल्याने मुलीच्या आईने या दोघा नराधामा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यासंदर्भात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी दोघा आरोपींवर भादवि 376 प्रमाणे गुन्हा दाखल करून पॉक्‍सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी दिली. 

ही बातमी वाचा ः तनूश्री दत्ताच्या वकिलावरच विनयभंगाचा गुन्हा

गावात तणावाचे वातावरण 
घोटसई गाव तंटामुक्त असल्याने येथील टिटवाळा पोलीस ठाण्यात कुठलाच गुन्हा दाखल होत नाही. मात्र एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत गेल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तंटामुक्त गाव असल्याने गावात मात्र या प्रकरणाने तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. दरम्यान अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांनी आणखी मुलींवर अशाच प्रकारचे अत्याचार केला असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

Vadapav Chinese merchants sexually assaulted girl case registered


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vadapav Chinese merchants sexually assaulted girl case registered