

Vadhavan Port Project Faces Local Opposition as Protesters Block Trucks Carrying Soil and Stones for Construction Work
esakal
तारापूर : प्रस्तावित वाढवण बंदराच्या उभारणीच्या कामासाठी भराव टाकण्याकरिता माती आणि दगडांची वाहतूक करणारे ट्रक स्थानिक आंदोलकांनी आज (ता. १८) रोखून धरले. वाढवण येथील टीघरे पाडा परिसरात संतप्त आंदोलकांनी थेट रस्त्यावर उतरत ठिय्या मांडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.