

-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : हिललाईन पोलीस ठाण्यात तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात त्यांचा मुलगा वैभव याला क्लीन चिट मिळाली आहे. या निर्णयावर महेश यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले, पोलीस यंत्रणा राजकीय दबाखाली काम करत आहे. मी कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.