Kalyan News: ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांनी काढला शिंदेंना चिमटा; वाचा नक्की काय म्हणाल्या?

यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवलीत विकास तर काय झालेला दिसत नाही. त्यांनी कार्य अहवाल छापलेला आहे.तो ज्यावेळी बाहेर पडेल, सगळ्यांसमोर प्रकाशित होईल.
Kalyan News: ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांनी काढला शिंदेंना चिमटा; वाचा नक्की काय म्हणाल्या?

kalyan Poltical News : शिवसेना शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या 10 वर्षातील कार्याचा लेखाजोखा आज त्यांचे वडील तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला जाणार आहे.

यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर यांनी त्याआधीच श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका करत म्हटले आहे की, आम्हाला विकास तर कुठे दिसत नाही. कार्य अहवाल प्रकाशित होईल तेव्हा आम्हालाही कळेल काय विकास केला ते असे म्हटले आहे. (shrikat shinde kalyan loksabha)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहावर्षाच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा कार्य अहवालाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

'विकासदशक - दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची ' या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी डोंबिवली मध्ये होणार आहे. (loksabha 2024)

यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी डोंबिवलीत विकास तर काय झालेला दिसत नाही. त्यांनी कार्य अहवाल छापलेला आहे.तो ज्यावेळी बाहेर पडेल, सगळ्यांसमोर प्रकाशित होईल.

तेव्हा आम्हालाही कळेल की त्यांनी विकास काय केला ते, अजून तरी आम्हाला तो कुठे दिसत नाही. कार्य अहवालात विकास कोणता दाखवतात ते अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतरच त्यावर भाष्य करेन अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. (maharashtra political News)

यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते. तसेच सायंकाळी अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल.(loksabbha news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com