अंबाडी-शिरसाड रस्ता खड्ड्यात; भर पावसात श्रमजीवीचे रस्त्यात भजन आंदोलन

दीपक हीरे
गुरुवार, 26 जुलै 2018

भर पावसात भर रस्त्यात आज संघटनेच्या सभासदांनी भ्रष्ट अधिकारी आणि बेजबाबदार ठेकेदारांविरोधात “भजन आंदोलन” करत भजन कीर्तन करत देवीला या भ्रष्टाचाऱ्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून साकडे घातले. 

वज्रेश्वरी - रस्ताच्या नादुरुस्तीने जनतेची संताप वाढत चालला असताना आज श्रमजीवी संघटनेने वज्रेश्वरी येथे नादुरुस्त रस्त्याविरोधात अभिनव आंदोलन केले. भर पावसात भर रस्त्यात आज संघटनेच्या सभासदांनी भ्रष्ट अधिकारी आणि बेजबाबदार ठेकेदारांविरोधात “भजन आंदोलन” करत भजन कीर्तन करत देवीला या भ्रष्टाचाऱ्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून साकडे घातले. 

भिवंडी तालुक्यातील असा एकही सुस्थितीत असलेला रस्ता  शिल्लक नाही. आज अशाच अंबाडी - शिरसाड या नादुरुस्त रस्त्याविरोधात अभिनव स्वरूपाचे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. भर पावसात भर रस्त्यात बैठक मांडून वज्रेश्वरी मातेची प्रतिमा समोर ठेवत भजन कीर्तन करत आंदोलन करत प्रशासन आणि ठेकेदारांविरोधात निषेध व्यक्त केला. येथील काँक्रीट आणि डांबर रस्ता मंजूर असताना ठेकेदाराने तो अपूर्ण स्थितीत खोदून ठेवला आहे. प्राथमिक शाळेसमोर गटार खोदून धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे.याबाबत वारंवार समज देऊनही अधिकारी आणि ठेकेदार सुधारत नसल्याने आज हे अभिनव आंदोलन करण्यात आले. 

यावेळी निवेदन देऊन भर रस्त्यातच सर्वांसमक्ष  आंदोलकांनी अधिकारी ठेकेदारांना जाब विचारला. यावेळी या ठेकेदार आणि अधिकार्यांना पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देऊन लेखी घेण्यात आले. यावेळी जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार यांनी या रस्त्याच्या आणि इतर बांधकाम विभागाच्या भरष्टाचाराचा पूर्ण तापशीलच आपल्या भाषणात मांडला. येत्या दोन दीवसात प्रत्येक कामाचे अंदाजपत्रकाचा तपशील असणारा फ्लेक्स कामाच्या ठिकाणी लावण्याचे त्यांनी संगीतले. तर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे यांनीही आपल्या भाषणात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांवर आसूड ओढले. संघटनेचे राज्य पदाधिकारी फ्रांसिस लेमोस यांनी दुरुस्तीवर झालेल्या खर्चात कसा भ्रष्टाचार झाला याचा तपशील सांगितला.

भिवंडी तालूका अध्यक्ष सुनील लोणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार , फ्रांसिस लेमोस, महिला अध्यक्ष जया पारधी, कातकरी घटक सचिव जयेंद्र गावित,आशा भोईर, केशव पारधी,जयेश पाटील, कमळ जाधव, भगवान देसले, मोहन शिंदे, लक्ष्मी मुकणे, यांच्यासह सर्व पाधाधिकारी सभासद होते, संघटनेच्या सरपंच सुनीता भावर, योगिनी देवी ट्रस्ट चे अविनाश राऊत, अधिकारी पवार, पोलिस निरीक्षक शेखर डोंबे, पोलिस उपनिरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक पवार यांच्यासह अधीकारी उपस्थित होते. तब्बल तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Vajreshwari roads are in bad condition