esakal | Valentines Special : मुंबईतील तीन सर्वात रोमँटिक जागा, जिथे तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत घालवू शकतात क्वालिटी टाइम

बोलून बातमी शोधा

Valentines Special : मुंबईतील तीन सर्वात रोमँटिक जागा, जिथे तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत घालवू शकतात क्वालिटी टाइम

जगातील सर्वात बेस्ट फिलिंग म्हणजे आपल्या पार्टनरसोबत छान वेळ घालवणं.

Valentines Special : मुंबईतील तीन सर्वात रोमँटिक जागा, जिथे तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत घालवू शकतात क्वालिटी टाइम
sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : जगातील सर्वात बेस्ट फिलिंग म्हणजे आपल्या पार्टनरसोबत छान वेळ घालवणं. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवला की आपल्याला एकप्रकारचं समाधान, शांतता कायम मिळते. 14 फेब्रुवारी, अर्थात व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशात व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमचा तुमच्या BAE (Before Everyone Else) सोबत, म्हणजेच तुमच्या विशेष व्यक्तीसोबत कुठेतरी जायचा, पूर्ण दिवस स्पेंड करायचा नक्कीच विचार असेल. याच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला मुंबईतील काही रोमँटिक जागा सुचवणार आहोत.

महत्त्वाची बातमी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबतच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना

मरिन ड्राइव्ह 

संपूर्ण मुंबईतील सर्वाधिक आकर्षणाचा विषय आणि मुंबईतील सर्वात रोमँटिक जागा म्हणजे मुंबईतील मरिन ड्राइव्ह. एकीकडे खळाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्याबाजूने गाडीतून का किंवा अगदी रात्री घेतलेला एक वॉक अतिशय रोमँटिक असा अनुभव कायमच देतो. म्हणूनच मुंबईतील जोडप्यांची मारिन ड्राइव्हला पहिली पसंती असते. मरीन ड्राइव्ह ही जागा जोडप्यांमध्ये प्रसिद्ध आहेच सोबतच अनेक सिनेमांचं शुटिंगही याच ठिकाणी झालं आहे. संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात प्रेमी युगुलं मारिन ड्राईव्हवर येतात. आपल्या जोडीदारासोबत सूर्यास्त पाहतात, एकमेकांसोबत उत्तम वेळ घालवतात. 

महत्त्वाची बातमी :  लाच घेताना उपनिबंधक आणि सहकार अधिकाऱ्याला रंगेहाथ धरलं, मुंबईत ACB ची कारवाई

वरळी सी-फेज : 

मारिन ड्राइव्ह प्रमाणेच मुंबईतील आणखी एक आकर्षणाचा म्हणजे मुंबईतील वरळी सी-फेज. या जागेचं जोडप्यांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. अर्थात समुद जिथे ती जागा रोमँटिक असणारच. वरळी सी-फेज वरूनही सूर्याचा उत्तम व्ह्यू दिसतो. म्हणूनही वरळी सी-फेज कपल्ससाठी अतिशय आवडती जागा आहे. तुम्हाला वरळी सी फेजचा उत्तम अनुभव घायचा असेल तर अथांग आणि निळ्याशार अशा अरबी समुद्रातून होणातरा सूर्योदय चुकवून चालणार नाही. तुम्ही ट्रेनने देखील वरळी सीफेज ला येऊ शकतात. महालक्ष्मी किंवा लोअर परळ स्थानकावरून तुम्ही सहज वरळी सीफेजला येऊ शकतात.    

महत्त्वाची बातमी :  लोकल प्रवाशांना होणार फायदाच फायदा; कारण आता लोकलमध्ये बसवणार MTRC सिस्टीम

मढ आयलँड आणि बीच : 

आपलं रिलेशनशिप कायम चिरतरुण ठेवण्यासाठी एकदुऱ्यासोबत क्वालिटी टाइम घालवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं क्वालिटी टाइम घालवण्यासाठी तुम्हाला एका उत्तम जागेची गरज असते, जिथे जाऊन तुम्ही तुमचा रोजचा थकवा, चिंता पूर्णपणे विसरू शकतात. म्हणूनच प्रेमी युगुलं किंवा जोडपी मढ आयलँड आणि बीचला कायम पसंती देतात  या बीचवर तुम्हाला प्रायव्हेट जागाही मिळते. जिथं तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत उत्तम वेळ घालवू शकतात.

मढ आयलँड आणि बीचच्या आसपास मढ किल्ला आणि काही उत्तम व्ह्यू असणाऱ्या जागाही आहेत. या सर्व जागांवर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत उत्तमोत्तम वेळ घालवू शकतात. मढ आयलँड आणि बीचवरुन तुम्ही अविस्मरणीय आणि मनाला शांतात देणारा अथांग समुद्रावरील सूर्यास्त पाहू शकतात.

valentines day special article about mumbais three best romantic places in mumbai