शाळांचे वार्षिक शुल्क माफीसाठी वंचित बहुजन आघाडीचे थेट शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात आंदोलन

तेजस वाघमारे - सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

सर्वसामान्य नागरिक बेरोजगार झाल्याने यंदा शाळांचे शुल्क माफ करावे, या मागणीसाठी शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी धारावी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रविवारी ( ता.26) आंदोलन करण्यात आले.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यातच शिक्षण विभागाने शाळा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. शाळा भरत नसतानाही शाळां पालकांकडे संपूर्ण शुल्काची मागणी करत आहेत. सर्वसामान्य नागरिक बेरोजगार झाल्याने यंदा शाळांचे शुल्क माफ करावे, या मागणीसाठी शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी धारावी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रविवारी ( ता.26) आंदोलन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी सेवा सुरु होणार? कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश...

विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असले तरी शाळा पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारत आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी गोरगरिबांकडे मोबाइल, इंटरनेटची सुविधा नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेला सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आताना शाळा शुल्काची मागणी करत आहेत. याबाबत काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. आता शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातून आता ही मागणी जोर धरू लागली आहे.

काय सांगता.. रुग्णवाहिकेतून होतेय चक्क डिझेलची वाहतूक; वाचा कुठे घडलाय हा प्रकार....

गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाणार नाहीत. यासाठी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारने माफ करावे.  या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी धारावी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने धारावी 90 फुटी रोडवरील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी 4 वाजता आंदोलन करण्यात आले.

नवख्या डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार! रुग्णालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या डॉ़क्टरांकडे मात्र दुर्लक्ष

गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शुल्क माफ करा असे विविध फलक हाती घेऊन कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पळून आंदोलन केले. या आंदोलनात वंचित आघाडीचे कार्यकर्ते सुनील कांबळे, अनिल साळवे, प्रकाश लांडगे, प्रवीण देठे आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit Bahujan aghadi agitation in the constituency of the Education Minister for the annual school fee waiver