esakal | पुढचे तीन महिने प्रकाश आंबेडकर सक्रिय राजकारणापासून राहणार दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar

पुढचे तीन महिने प्रकाश आंबेडकर सक्रिय राजकारणापासून राहणार दूर

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष (Vanchit Bahujan Aghadi president) प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) पुढचे तीन महिने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार आहेत. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओ चित्रफीत जारी करुन ही माहिती दिली आहे. व्यक्तिगत कारणांमुळे (personal reason) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर राजकारणांपासून (politics) दूर राहणार आहेत. पाच जिल्ह्यातील निवडणुकीचे वातावरण पाहता, आंबेडकरांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्षांची धुरा ही रेखा ताई ठाकूर यांच्यावर सोपवली आहे. (Vanchit Bahujan Aghadi president prakash ambedkar for next three months will not involve in active politics)

"मी स्वत: पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात तीन महिन्यांसाठी कार्यरत राहणार नाही. माझ्या व्यक्तीगत कारणामुळे कार्यरत राहणार नाही. पण पक्ष, संघटन चाललं पाहिजे. आंदोलन सुरु केलीयत. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहे. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणं आवश्यक आहे" असे प्रकाश आंबडेकर म्हणाले.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना डावलायचे अन् त्यांच्याच समर्थकांना कुरवाळायचे

त्यांनी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. "डॉ. अरुण सावंत, महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी इततर सर्व कार्यकर्ते रेखाताईंना मदत करतील. पक्ष यशस्वीरित्या त्याचबरोबर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आपण सगळेजण रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करालं" अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.

loading image