वाशी रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड; डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती

शरद वाघदळे
Wednesday, 28 October 2020

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. तर हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डातही तोडफोड करण्यात आली आहे

वाशी  - कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. तर हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डातही तोडफोड करण्यात आली आहे. यात हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली असून, डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

शिवसैनिकांनो तयार रहा; राज्यात एकहाती भगवा फडकवायचाय - उद्धव ठाकरे

नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोना असोलेशन वॉर्डमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. यात रुग्णालयातील व्हेंटिलेटर, डायलिसीसची मशीन, पंखे साहित्याची नासधूस केली. तसेच सुरक्षा रक्षकास मारहाण करून डॉक्टर आणि नर्सनाही धक्काबुक्की केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

 

नवी मुंबई महापालिकेच्या वाशीमधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला मंगळवारी सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पालिकेच्या रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. परंतु त्याचा रिपोर्ट आला नव्हता. त्याच्यावर उपचार सुरू होते. रात्री  उपचारा दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी आयसोलेशन वॉर्डमध्ये जाऊन राडा घातला आणि रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी त्यांना अडवण्यास गेलेल्या सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करण्यात आली आहे.

लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, महिलांशी संपर्क साधण्यास सुरुवात

या प्रकारामुळे येथील डॉक्टर आणि कर्मचारी भीतीची वातावरण असून योग्य सुरक्षा पुरवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. वाशी पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आला आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vandalism by relatives of a dead patient at Vashi Hospital Fear among doctors and staff