
डोंबिवली : मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये 13 प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यातील चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक झाली असून मनसे तर्फे उद्या ( मंगळवारी ) आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी समाज माध्यमातून आपले मतं व्यक्त करत सांगितले की लाडक्या वंदे भारतने लोकलचे वांदे केले आहेत..