
Vande Bharat Express
ESakal
मुंबई : मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस आता दिव्यांग प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनली आहे. भारतीय रेल्वेने या गाडीत व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी रॅम्प, स्वयंचलित दरवाजे, हँडरेल, तसेच ब्रेल लिपीतील फलक अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या उपक्रमातून सर्व प्रवाशांसाठी समान आणि सन्मानजनक प्रवासाचा अनुभव देण्याचा रेल्वेचा प्रयत्न दिसून येतो.