Vande Bharat Accident : ‘वंदे भारत’ला पुन्हा गुरांची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vande Bharat hit Cattle again fourth Accident mumbai

Vande Bharat Accident : ‘वंदे भारत’ला पुन्हा गुरांची धडक

मुंबई : मुंबई सेंट्रल-गांधीनगरदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला गुरुवारी पुन्हा एकदा गुरांनी धडक दिली. या अपघातात ‘वंदे भारत’च्या समोरील भागाचे नुकसान झाले. आतापर्यंत अशा प्रकारे ‘वंदे भारत’ला चार वेळा गुरांनी धडक दिली आहे. गांधीनगरहून मुंबईकडे निघालेल्या ‘वंदे भारत’ एक्‍स्प्रेसपुढे शुक्रवारी (ता. १) संध्याकाळी ६.२३ वाजता गुजरातच्या उदवाडा आणि वापी रेल्वे स्थानकांजवळ गुरांचा कळप आला. ‘वंदे भारत’ने या गुरांना जोरदार धडक दिली; मात्र मोटरमनने लगेच ब्रेक दाबून गाडी थांबवली. त्यानंतर सायंकाळी ६.३५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. या अपघातात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या पुढील भागाचे नुकसान झाले.

आतापर्यंतचे अपघात
१. ६ ऑक्टोबर २०२२ - वटवा ते मणीनगर स्थानकांदरम्यान म्हशींना धडक
२. ८ ऑक्टोबर २०२२ - कंझरी ते आणंद स्थानकांदरम्यान गायीला धडक
३. २९ ऑक्टोबर २०२२ - अतुल रेल्वे स्थानकाजवळ बैलाला धडक