
Latest Mumbai news: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी सकाळी तांत्रिक अडथळ्यामुळे मार्ग बदलावा लागला. दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने गाडीला कल्याणमार्गे वळवण्यात आले. या कारणामुळे वंदे भारत एक्सप्रेसला दीड तास विलंबाचा फटका बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ वंदे भारत एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत, सकाळी ५:२५ वाजता, सीएसएमटी स्थानकावरून सुटली. मात्र दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गाडी ४० मिनिटे ठप्प झाली. ही समस्या सकाळी ६:१० वाजता निर्माण झाली होती.