'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

मुंबई - वेळ बदलतोय, अशात तरुण किंवा अविवाहितांसाठी त्यांची पर्सनल स्पेस मिळवणं आधीच्या तुलनेत आता सोपं झालंय. साधारणतः एका मध्यमवर्गीय परिवारात लहान घरं, कमी खोल्या या सारखे प्रॉब्लेम कॉमन आहेत. अशात कपल्सला मिळणारी प्रायव्हसी जवळजवळ नसल्यात जमा असते. मग प्रश्न उपस्थित होतो तो रोमँटिक स्पेसचा. अशात रोमँटिक रिलेशनशिपमध्ये पर्सनल स्पेससाठी तरुणांची धाव हॉटेल्सकडे जाते. यासाठी आता अनेक ऍप्स आहेत, जे तरुणांना किंवा कपल्ससाठी फायद्याचे ठरू शकतात. तिथे ते त्यांचा रोमँटिक वेळ छान घालवू शकतात.  

मात्र अनेक हॉटेल मालकांच्या विचारसरणीमुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागतोय. तरुणांना किंवा कपल्ससाठी हॉटेलमधील खोली बुक करणं आता तसं सोपं झालंय. मात्र यातही मॉरल पोलिसिंगची मोठी समस्या एक भिंत म्हणून उभी आहे. 

मोठ्या शहरांमध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे तुम्हाला काही तासांसाठी पटकन खोल्या मिळतात. मात्र ती खोली बुक करताना ज्या व्यक्तींशी संपर्क येतो, त्या व्यक्ती  ज्या पद्धतीने कपल्सकडे पाहतात, ते अत्यंत लाजिरवाणं ठरतं. अनेकदा अशा हॉटेलमधून बाहेर निघणाऱ्या कपल्सकडे खूप वाईट नजरेनं पाहिलं जातं. 

बदलत्या वेळेबरोबर मोबाईलचा वापर वाढलाय. सर्व गोष्टी एका क्लिकवर येऊन ठेपल्यात. अशात तरुणांमध्ये काही ऍप्स भलतेच फेमस झालेत. या ऍप्सच्या माध्यमातून सुरक्षित आणि सुविधाजनक जागांवर अविवाहित कपल्स जाऊ शकतात. आपला रोमँटिक वेळ चांगल्या पद्धतीने घालवू शकतात. 

२०१३ मध्ये 'स्टेअंकल'ची सुरुवात झाली. त्यानंतर 'ओयो'सारख्या हॉटेल्सची सुरुवात झाली. सहा वर्षांत ओयोच्या ८० देशात तब्ब्ल ८०० शहरांमध्ये १२ लाख खोल्या आहेत. याव्यतिरिक्त ब्रेवी स्टे, मी स्टे, लव स्टे, बॅग २ बॅग सारख्या ऍपच्या माध्यमातून अगदी पाचशे रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंत खोल्या बुक करता येतात. 'स्टेअंकल'सारखं ऍप तर एक 'लव्ह किट' देखील देतं. ज्यामध्ये कंडोम, चॉकलेट, ल्युब्रिकंट आदी गोष्टी असतात.   

या सर्वांत एक अत्यंत महत्त्वाची त्रासदायक ठरणारी बाब म्हणजे मॉरल पोलिसिंग. कोईम्बतूरमध्ये अशी एक घटना घडली आहे. अविनाश नामक एका व्यक्तीचं ओयोसोबत सहा महिन्यांचं बुकिंग होतं. मात्र ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन्स असोसिएशनने अविवाहितांना खोल्या देण्यावर आक्षेप घेतल्याने तिथल्या तहसीलदाराने हे हॉटेलचं बंद केलं. जयपूरमध्ये एका कपलने हॉटेलमध्ये खोली बुक करण्यासाठी आपलं ID देखील दिलं, मात्र त्या दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने त्यांना बुकिंग नाकारलं गेलं. 

या सारख्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून खोल्या तर मिळतात. मात्र सेफ्टी आणि हॉटेलवर मिळणाऱ्या सुविधांवर अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. 

various mobile apps are giving facility to book love room for unmarried couples 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com